** ‘ झेप ‘ या उपक्रमाअंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,भुलाई येथे इंग्रजी विषयासंबंधीत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन **
स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भुलाई येथे ‘ झेप ‘ या उपक्रमाअंतर्गत इंग्रजी विषयासंबंधीत सौ. वनिता लाखे कासार , सहाय्यक शिक्षिका, शहिद भगतसिंग विद्यालय आर्णी यांचे मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ ममता दिनेशराव नरवडे ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. वनिता लाखे कासार , सहाय्यक शिक्षिका , शहिद भगतसिंग विद्यालय, आर्णी ह्या होत्या.
सौ वनिता लाखे यांनी इंग्रजी विषयासंबंधीत वाटणारी मनातील भिती कशी घालवायची, त्याचबरोबर इंग्रजील मोठं मोठी स्पेलिंग कसा लक्षात ठेवायचा याबाबतची माहिती दिली. त्याबरोबर इंग्रजी विषयासंबंधीत ज्ञान कशा पद्धतीने करायचे याबाबत मार्गदर्शन केले . सौ वनिता लाखे ह्या स्वतः उत्तम ध्यान प्रशिक्षक ,सल्लागार तसेच रेकी बरे करणाऱ्या म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयासंबंधीत वाटणारी काळजी आणि भिती कमी करण्यात उपयुक्त ठरली. विद्यार्थ्यांचे मेडिटेशन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया घेतली असता इंग्रजी विषयाबाबतची भिती कमी झालेली आढळून आली तसेच त्यांच्या आत्मविश्वास वाढला. दररोज इंग्रजीतील किमान पाच शब्द पाठ करणार अशी विद्यार्थ्यांनी ग्वाही दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रिती विठ्ठलराव ढबाले तर आभारप्रदर्शन श्री गजानन विठ्ठल डेरे यांनी केले.
या कार्यक्रमास अमृता लाखे, कैलाश भाऊ लाखे, सचिन चव्हाण, गजानन मिराशे, प्रदीप खुणे, ओंकार कदम उपस्थित होते.